वृत्तसंस्था/ दुबई
संयुक्त अरब अमिरातमधील अबु धाबी शहराने पाकच्या क्रिकेट स्पर्धांचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. आता दक्षिण आशिया क्रिकेट लीग स्पर्धेतील उर्वरित सामने पुढील महिन्यात अबुधाबीमध्ये खेळविले जाणार आहेत.
अरब अमिरात शासनाकडून पाक सुपर लीग स्पर्धेला अधिकृत मान्यता दिली असून आता या लीग स्पर्धेतील उर्वरित 20 सामने अबु धाबीत पुढील महिन्यात खेळविले जातील. दक्षिण आशियाई क्रिकेट लीग हंगामाला जूनमध्ये प्रारंभ होणार असून या स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक पीसीबीकडून लवकरच जाहीर केले जाईल. कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यात पीसीबीने पाक सुपर लीग स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत पाकमध्ये सहभागी झालेल्या संघातील सात जणांना कोरोनाची बाधा झाले होती.
एप्रिल महिन्यात सदर स्पर्धा कराचीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न चालू होते पण आता ही स्पर्धा अबु धाबीमध्ये घेतली जाणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे अलिकडच्या कालावधीत संयुक्त अरब अमिरातच्या अबु धाबीत राजधानीमध्ये विविध क्रिकेट स्पर्धा घेतल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे मार्शल आर्टस् लीग स्पर्धेतील अनेक लढती अबु धाबीत 2020 साली यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेसाठी स्थानिक क्रिकेटपटू आणि विदेशी क्रिकेटपटू 25 मे रोजी अबु धाबीकडे प्रयाण करतील. चार्टर्ड फ्लाईटने अबु धाबीला जाण्यापूर्वी विदेशी तसेच स्थानिक क्रिकेपटू आणि इतर अधिकाऱयांना पाकमध्ये तीन दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन राहील. सहावी पाक सुपर लीग स्पर्धा चार मार्च रोजी कोरोना महामारी समस्येमुळे तहकूब करण्यात आली होती. 14 सामन्यानंतर ही स्पर्धा थांबविण्यात आली होती.