ऑनलाईन टीम / श्रीनगर :
संपूर्ण जग कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना पाकिस्तान मात्र, दहशतवाद पसरविण्यात मग्न आहे. आज पाकिस्तानी सैन्याकडून काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार आणि उखळी तोफांचा जोरदार मारा करण्यात आला.
पाकिस्तानला कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य नाही. त्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून आज दुपारी विनाकारण सीमारेषेलगतच्या कसबा आणि किरनी सेक्टरमध्ये गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला. यामध्ये एक भारतीय तरुण जखमी झाला आहे. भारतीय सैन्याकडूनही पाक सैन्याच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.