सेन्सेक्स 37.87 तर निफ्टी 12.25 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात पाचव्या सत्रात तेजीचा कल राहिल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 37.87 अंकांनी वधारला आहे. गुरुवारी मात्र जगभरातील बाजारांमध्ये नकारात्मक कल राहिला होता. असे असतानाही निर्देशांकात मजबूती कायम राहिली होती. मुख्य कंपन्यांमध्ये कोटक बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो व भारती एअरटेल यांच्या लिलावाचे बाजाराला समर्थन मिळाले आहे.
बाजारामध्ये चढउताराच्या प्रवासात मुख्य तीस समभागांच्या सेन्सेक्समध्ये सुरुवातीच्या दरम्यान नकारात्मक कल होता, परंतु अंतिम क्षणी सेन्सेक्स 37.87 अंकांसह 0.06 टक्क्यांच्या तेजीसह निर्देशांक 60,298.00 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 12.25 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,956.50 वर बंद झाल्याचे दिसून आले. निफ्टी निर्देशांकाची एकंदर वाटचाल ही यशदायी राहिली असून ती अशीच राहणार असा अंदाज आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिडकॉर्प, इंडसइंड बँक, भारतीय स्टेट बँक आणि आयटीसी यांचे समभाग प्रामुख्याने लाभात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये डॉ.रेड्डीज लॅब, लॅबोरेटरीज, विप्रो, इन्फोसिस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, ऍक्सिस बँक आणि नेस्ले यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत. आयटी निर्देशांक तेजीसह नफावसुली करण्यावर भर देत होता. आयटी कंपन्यांची कामगिरी ही चांगलीच राहिली आहे, रिऍल्टी, धातू निर्देशांकही गुरुवारी तेजी राखून होता. आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. युरोपीयन बाजारात मात्र मिळताजुळता कल राहिला होता. विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारामध्ये निव्वळ लिलावामध्ये बुधवारी 2,347.22 कोटी रुपये किमतीच्या समभागांची खरेदी झाल्याची माहिती आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- कोटक महिंद्रा 1904
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1894
- भारती एअरटेल 733
- अल्ट्राटेक सिमेंट 6709
- इंडसइंड बँक 1105
- पॉवरग्रिड कॉर्प 231
- स्टेट बँक……. 532
- आयटीसी……. 315
- एशियन पेन्ट्स 3535
- टेक महिंद्रा.. 1108
- आयसीआयसीआय 885
- एचडीएफसी 2497
- बजाज फिनसर्व्ह 16842
- टाटा स्टील….. 112
- आयआरसीटीसी 713
- अंबुजा सिमेंट. 409
- ज्युबिलंट फूड 619
- एसीसी…….. 2325
- डाबर इंडिया.. 594
- एसबीआय लाईफ 1323
- सीजी कंझ्युमर 396
समभाग घसरलेल्या कंपन्या
- डॉ.रेड्डीज लॅब 4225
- विप्रो…………. 435
- इन्फोसिस…. 1582
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1261
- ऍक्सिस बँक… 765
- नेस्ले……… 19598
- एचसीएल टेक 973
- टीसीएस…… 3381
- टायटन…….. 2480
- सनफार्मा……. 916
- बजाज फायनान्स 7490
- एनटीपीसी….. 160
- हिंदुस्थान युनि 2681
- मारुती सुझुकी 8934
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2660
- एसबीआयकार्ड 957
- बीपीसीएल….. 347
- मॅक्स फायनान्स 831
- ओएनजीसी…. 135
- सिमेन्स…….. 2875
- अशोक लेलँड 147