वारणानगर / प्रतिनिधी
येथील वाघबीळ फाट्याजवळ वृध्द महिलेच्या मानेला हिसडा मारून पाच तोळे सोन्याचे चिताक पळवणाऱ्या दोघा चोरट्यांचा पाच दिवसात छडा लावण्यात कोडोली पोलीसांचे यश मिळवत त्यांना मुद्देमालासह अटक केली आहे.
दानेवाडी येथील गट नबंर १०५ या शेतात मंगळवार दि.७ रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रीमती बनाबाई शंकर रांजगणे वय ८० रा. राक्षी ता. पन्हाळा या शेंगा तोडत असताना या वृध्द महिलेच्या मानेला हिसडा मारून, तिला खाली पाडून तिच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे चिताक चोरण्याची जबरी चोरी करण्यात आली होती.
या प्रकरणी राहुल राजेंद्र पडवळ,वय २८,रा- राक्षी, अविनाश भगवान जगताप, वय २७ रा- मिठारवाडी ता – पन्हाळा या दोघांना आज शनिवार दि. ११ रोजी कोडोली पोलीसानी अटक केली असून या चोरीचा पाच दिवसातच छडा लावला आहे.यातील आरोपी पडवळ व ज्ञगताप यानी गुन्हा कबुल केला असून जगताप याच्या अंगझडतीत सोन्याचे चिताक मिळून आले तसेच या गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकलही पोलीसानी जप्त केली आहे निव्वळ सोने ३९ ग्रॅम ६०० मिलीची रक्कम १ लाख ९४ हजार चारशे व मोटर सायकल २३ हजार रू. असा २ लाख २४ हजार ४० हजार रू. मुदेमाल पोलीसानी हस्तगत केला आहे.
शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांच्पासह कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरेद्र पाटील यानी तसेच गुन्हा अन्वेषनच्या तपास पथकाने गुप्त माहिती व मोबाईल लोकेशनच्या अधारे या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीना जेरबंद केले आहे.