प्रतिनिधी / बेळगाव
नेहरूनगर येथील अनुग्रह योग वर्गात 1 जानेवारीपासून पाच दिवसीय योग शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये किरण मन्नोळकर, मोहन बागेवाडी, जोतिबा भादवणकर, अंजली गाडगीळ, पुरुषोत्तम पटेल व चंद्रकांत खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले. यापुढे पहाटे 5.30 ते 7 या वेळेत नियमित योगवर्ग सुरू राहील. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.