तब्बल 69 जणांनी घेतली माघार : केपेतून तीन उमेदवार बिनविरोध
प्रतिनिधी / पणजी
म्हापसा, मुरगाव, मडगाव, केपे व सांगे या पाच पालिकांसाठी आता एकूण 366 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण 69 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. केपे पालिकेच्या 1, 3 आणि 7 या प्रभागातील उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या पाच पालिकांची निवडणूक 21 मार्च रोजी होणार आहे.
निवडणूक लढविणाऱयांमध्ये म्हापसामधून 80, मुरगाव 112, मडगाव 90, केपे 43 आणि सांगेतील 41 उमेदवारांचा समावेश आहे.
म्हापशात प्रभाग 8 मध्ये सर्वाधिक 14 उमेदवार
म्हापसा पालिकेच्या प्रभाग 14 मध्ये सर्वाधिक 8 उमेदवार आहेत. त्याशिवाय प्रभाग 12 आणि 18 मध्ये प्रत्येकी 6 तर प्रभाग 3 आणि 20 मध्ये प्रत्येकी 5 उमेदवार आहेत. प्रभाग 2, 5, 7, 8, 11, 15, 16, 17, मध्ये प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. 1, 4, 9, 10, या प्रभागात प्रत्येकी 3 तर उमेदवार आहेत. उर्वरित प्रभागात दोघांमध्ये थेट लढत होणार आहे.
मडगावात 25 प्रभागांसाठी 90 उमेदवार
मडगावात 25 प्रभागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग 9 मध्ये सर्वाधिक 7 उमेदवार आहेत. 1, 3, 8, 14, 15, 16, या प्रभागात प्रत्येकी 5. प्रभाग 7, 10, 20, 23, 24, 25, मध्ये प्रत्येकी 4 आणि प्रभाग 4, 5, 6, 12, 13, 18, मध्ये प्रत्येकी 3 उमेदवार आहेत. उर्वरित प्रभागात दोघांमध्ये थेट लढत होणार आहे.
राज्यात सर्वाधिक 112 उमेदवार मुरगावात
सर्वाधिक 112 उमेदवार असलेल्या मुरगाव पालिकेच्या महिलांसाठी राखीव प्रभाग 17 मध्ये सर्वाधिक 10 उमेदवार आहेत. प्रभाग 12 व 22 मध्ये प्रत्येकी 9, प्रभाग 10 व 20 मध्ये प्रत्येकी 7, प्रभाग 4, 14, 25 मध्ये प्रत्येकी 6, प्रभाग 16 व 24 मध्ये प्रत्येकी 5, प्रभाग 1 व 2 मध्ये प्रत्येकी 4, प्रभाग 3, 6, 7, 11, 15, 19, 21, 23 मध्ये प्रत्येकी 3 तर उर्वरित प्रभागात दोघांमध्ये थेट लढती होणार आहेत.
सांगेत बहुतेक दुरंगी, तिरंगी लढती
सांगे पालिकेच्या प्रभाग 7 आणि 10 साठी प्रत्येकी 6 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग 2 व 4 मधून प्रत्येकी 5, प्रभाग 6 व 8 मधून प्रत्येकी 4, प्रभाग 1, 3 व 9 मधून प्रत्येकी 3 तर प्रभाग 5 मधून दोघांमध्ये थेट लढत होणार आहे.
केपेत तीन प्रभागांमध्ये बिनविरोध निवडी केपे पालिकेच्या 13 मधील 1, 3 व 7 या प्रभागातील उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे तेथे आता केवळ 10 प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील प्रभाग 12 मध्ये सर्वाधिक 8 उमेदवार आहेत. प्रभाग 4 मध्ये 6, प्रभाग 8 आणि 10 मध्ये प्रत्येकी 5, प्रभाग 5 व 13 मध्ये प्रत्येकी 4 तर प्रभाग 6, 9 व 11 मध्ये प्रत्येकी 3 उमेदवार आहेत. प्रभाग 2 मधून दोघांमध्ये थेट लढत होणार आहे.