देशात नवीन कंपन्यांच्या संख्येत वाढ
नवी दिल्ली
संपूर्ण जगभरात सर्वाधिक युनिकॉर्न स्टार्टअपच्या यादीमध्ये भारत अमेरिका आणि चीननंतर तिसऱया स्थानी राहिला आहे. ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट फर्म पेडिट सुइसच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बाजारमूल्याच्या तुलनेत पाहता 336 लिस्टेड कंपन्यांच्या तुलनेत भारतामध्ये 100 युनिकॉर्न असून ज्यांचे संयुक्त बाजारमूल्य 17.3 लाख कोटी रुपये आहे.
भारतामध्ये नवीन सुरु होणाऱया कंपन्यांमध्ये स्टार्टअपचे प्रमाण 6-7 टक्के आहे. हा टक्का मागील एक दशकामध्ये वाढत राहिला आहे. क्रेडिट सुइसमध्ये इक्विटी स्ट्रटजी, आशिया पॅसिफिक ऍण्ड इंडियाचे नीलकांत मिश्रा यांनी म्हटले आहे, की भारतामध्ये वेगवेगळय़ा स्वरुपातील इंडस्ट्रीजमध्ये 100 युनिकॉर्न आहेत. टेक्नॉलॉजी आणि त्याच्याशी संबंधीत अधिक स्टार्टअप्स असल्याचे समजते.
2005 नंतर नोंदणीकृत कंपन्या
जास्तीत जास्त कंपन्या 2005 नंतर स्थापन करण्यात आल्या आहेत. युनिकॉर्नसाठी बेंगळूर सर्वात मोठे शहर असून दिल्ली आणि मुंबईचा त्यानंतर नंबर लागतो. फिनटेक कंपन्यांनी 73 हजार कोटी रुपयांचे भांडवल आकर्षित केले आहे.
सर्वाधिक युनिकॉर्न
फिनटेक क्षेत्रातील कंपन्या
क्षेत्र……….. युनिकॉर्न
फिनटेक…….. 13 टक्के
आयटी/टेक…. 12 टक्के
सॉफ्टवेअर सर्व्हिस 12 टक्के
ई-कॉमर्स……. 10 टक्के
हेल्थकेअर…….. 9 टक्के
अन्य 44 टक्के