सतीश पाटील : नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार
वार्ताहर/ खडकलाट
गत 5 वर्षात माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नात खडकलाट व्याप्तीत सुमारे 70 कोटी रुपयांची विकासकामे झालेली आहेत. त्यामुळे जनता आमच्या पाठिशी असून यापुढील काळात गावचा कायापालट करण्यात येईल, असे प्रतिपादन ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. येथील अशोक यादव फार्म हाऊसवर आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप लाटकर उपस्थित होते.
सतीश पाटील पुढे म्हणाले, गावात प्रत्येक समाजाला समुदाय भवनाची निर्मिती, पाण्याचे योग्य नियोजन, शेतीला पाणीपुरवठा अशी कामे करण्यात आली असून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचविण्यात येत आहेत. त्यामुळेच 35 पैकी 25 जागांवर आपले उमेदवार निवडून आल्याचे सांगितले.
दरम्यान, अशोक यादव, अनिल यादव व विठ्ठल यादव यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी बंडा सरदार, प्रवीण पाटील, चंद्रकांत भडगावे, प्रल्हाद माळगे, दिलीप शिंत्रे, इलियास लाटकर, रोहित यादव, गोपाळ पाटील, शकुंतला यादव, सलमा लाटकर, शिवानंद येडूरे, अजित माळकरी, बाबासाहेब शिरगावे, दिपाली वराळे, रजनीकांत वराळे, मिथुन वराळे, शिवाजी खाडे, बाळासाहेब खोत, बाबु यादव आदींसह नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.