उमरगा / प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील एकुरगा येथील युवकांने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.त्यामुळे तालुक्याच्या उज्वल यशाच्या परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.एकुरगा येथील असित नामदेव कांबळे याने हे यश संपादन केले आहे. या पूर्वी घेण्यात आलेल्या (आयएफएस) भारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६वा आले होते. एकूरगा येथील नामदेव कांबळे हे उमरगा आगारात एसटी मध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत होते.एका सामान्य कुटुंबातील तरुणांना हे यश मिळाले आहे. त्यांचं तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे . दिल्ली येथिल आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी ते अभ्यास करीत होते .
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सहाव्या प्रयत्नात त्यांनी हे यश खेचून आणले होते. असित यांचे प्राथमिक शिक्षण एकुरगा येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.माध्यमिक शिक्षण शिवशक्ती विद्यालयात झाले.तर महाविद्यालयीन शिक्षक महात्मा गांधी विद्यालय अहमदपूर येथे पूर्ण झाले.
१२वी नंतर पदवीसाठी पुणे येथिल ( vit)विश्वकर्मा इंस्टिट्युट ऑफ टेकनॉलॉजी या शिक्षण संस्थेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेतला व आपले पदविपर्यंतचे शिक्षण येथेच पूर्ण केले.त्याचे वडील नामदेव कांबळे हे राज्य परिवहन महामंडळ उमरगा येथे मेकॅनिक या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.आई ललीता कांबळे अंगणवाडी सेविका आहे .
असितवर अभिनंदनाचा वर्षाव
यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश संपादित केल्याने तालुक्यातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी असितचे कौतुक केले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला असित ने पुष्पहार घालून अभिवादन केले.
सण २०१३ पासून या परीक्षेची तयारी करीत होतो.सहाव्या प्रयत्नात हे यश मिळाले आहे.मागील सहा महिन्यांपूर्वी माझी आय एफ एस (वनसेवा) परीक्षेत निवड झाली होती या नंतर या निकालाने आनंद होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत गुणवत्ता असते कठोर परिश्रम आणि जिद्द चिकाटीने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते .
असित कांबळे