नवारस्ता / प्रतिनिधी
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.आदरणीय बाळासाहेब ठाकरेसाहेब यांचे 08 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांचे नेतृत्वाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला होता सातारा जिल्हयाकरीता 03 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले आहे.
त्यातील 1 लाख शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात करण्याचे उदिष्ट होते त्यानुसार आज स्व.आदरणीय बाळासाहेब ठाकरेसाहेब यांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघातील शिवसेना सदस्यांची नोदंणी केलेले 71 हजार अर्ज शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख मा.श्री.जयवंतराव शेलार यांचेकडे सुपुर्द करताना गृहराज्यमंत्री ना.मा.श्री.शंभूराज देसाईसाहेब व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते.वेळ कमी मिळाल्याने उर्वरीत राहिलेले 29 हजार शिवसेना नोंदणी अर्ज एक महिन्याभरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मुंबईकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत.