शासकीय मालमत्तेची लूट थांबणार कधी ?
प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील जुन्या आणि नव्या एमआयडीसीत अनेक कंपन्याना प्रतापसिंहनगरातील भंगार चोरट्यांचा सतत ग्रहण लागलेले असते. तीच परिस्थिती कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागात असलेल्या मेकनिकल कॉलनीत सध्या सुरू आहे. अगोदर या भागात अनेक शासकीय खोल्या वापराविना पडून आहेत. अगदी त्या खोल्यांची दारे खिडक्या गायब झाली आहेत.
आता मेडिकल कॉलेज या परिसरात होत असल्याने त्या परिसरातील काही खोल्या जबरदस्तीने खाली केल्या जात आहेत. त्या खोल्यांची दारे खिडक्या चोरीला जाण्याचा प्रताप सुरू आहे. या प्रकाराने पाटबंधारे विभाग अगोदर भयभीत झाला आहे. शासकीय मालमतेची लूट थांबणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे.