रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य : रस्ते दुरुस्तीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष : खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. मात्र स्मार्ट सिटी योजनेत समावि÷ नसलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. पाटील गल्ली रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. सदर खड्डे दुरूस्त करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीस अडथळे ठरत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
काही रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. बहुतांश रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले होती. मात्र कोरोना विषाणुच्या प्रसारामुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. मागील वषी पावसाळय़ात खराब झालेल्या काही रस्त्यांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत करण्यात आला नाही. अशा रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी महापालिकेने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळय़ानंतर सदर खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्याची गरज होती. मात्र निधी नसल्याचे कारण सांगून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अद्यापही हे खड्डे जैसे थे असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्डय़ांमध्ये माती टाकण्यात आली आहे. पाटील गल्लीत उषाताई गोगटे शाळेसमोर मोठा खड्डा निर्माण झाला असून बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. काँग्रेस रोडवरून जुना धारवाड रोडकडे जाण्यासाठी पाटील गल्लीच्या रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. पण दुरूस्ती करण्याकडे कानाडोळा करण्यात आल्याने अवजड वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. तसेच शनिमंदिर ते हेमुकलानी चौकापर्यंतच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाल्याने याठिकाणी वाहनांचे अपघात होत आहेत. कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या पायथ्याशी शनिमंदिरजवळील खड्डय़ांमुळे वाहनधारकांना अडचण निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.