प्रतिनिधी/ कराड
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहकार, पणन खात्याच्या मंत्रिपदी तसेच जिह्याच्या पालकमंत्रीपदी संधी मिळाल्याबद्दल बाळासाहेब पाटील यांचा कराड शहरातील पाटील भावकीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ‘पाटील भावकी कराड’ या लोगोचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील संपूर्ण पाटील भावकी एकत्र आली. त्यांच्याशी बाळासाहेब पाटील यांनी संवादही साधला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री बाळासाहेब पाटील यांना प्रथमच सहकार व पणन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. याबद्दल मंत्री पाटील यांचा शहरातील पाटील भावकीतर्फे सत्कार करण्यात येणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम घेता आला नव्हता. सध्या प्रादुर्भाव कमी झाल्याने हा कार्यक्रम उत्सहात पार पडला.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जयवंत पाटील माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोकराव पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, सचिव प्रकाशराव पाटील, ज्योतिर्लिंग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अरुण पाटील, युवराज पाटील, विठ्ठल निवृत्ती पाटील, विठ्ठल लक्ष्मण पाटील, दिलीप शंकर पाटील, श्रीकृष्ण आण्णासाहेब पाटील, माजी नगरसेवक ऍड. मानसिंगराव पाटील, दिलीप मोहन पाटील, विष्णुकांत किसन पाटील, मधुकर तुकाराम पाटील, अशोक बाळकृष्ण पाटील, अशोक आबासाहेब पाटील, चंद्रकांत तुकाराम पाटील, विकास आनंदराव पाटील यांच्यासह पाटील ज्येष्ठ तसेच तरुण उपस्थित होते.
पाटील भावकीतर्फे सत्काराचा हा दिवस आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस आहे. घरातली सर्व लोक अनेक दिवसानंतर एकत्र आल्याने खूप आनंद होत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व पाठींबा यामुळे मला संधी मिळाली आहे. यापुढेही आपण असेच एकत्र राहू, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.