प्रतिनिधी/ म्हसवड
माण तालुक्यातील पाटोळ खडकी येथे एका वयोवृद्धाचे निधन झाले होते त्यांच्या अंत्यविधिला उपस्थीत राहिलेल्या कुटुंबातील प्रथम दोघे पती पत्नी बाधीत झाले होते त्यानंतर चारच दिवसात त्याच घरातील 53 वर्षीय पुरुष,22 वर्षीय ,17 वर्षीय 15वर्षीय युवक, 75 वर्षीय व 42 वर्षीय महिला असे गुरुवारी रात्री उशीरा पॉजीटिव आल्याने खडकी गावाच्या पाया खालची वाळू सरकली असुन असुन आजुन किती लोक या साखळीत सापडतात याची भिती खडकीकरांच्या मनात घर करुन बसल्याने खडकी भय भित झाली आहे
मुंबई येथे पोलिस खात्यातुन सेवानिवृत्त झालेले खडकी येथील दोन बंधू व त्याच्या पत्नी मुले, सुना, नातंवडे हे 20 ते 25 दिवसापूर्वी मुंबई वरुन पाटोळ खडकी येथे वडिलांचे निधन झाले म्हणून आले होते या कुटुंबाचा संपूर्ण विधी झाल्यावर पोलिस खात्यातुन निवृत्त झालेल्या साहेबांची पत्नी आजार पडल्यावर म्हसवड येथे आरोग्य केंद्रात तिन दिवस उपचार केले काहीच फरक पडत नसल्याने म्हसवड येथील खाजगी दवाखाना व हॉस्पिटल येथे उपचार घेतले त्यानंतर सातारा येथे उपचारासाठी नेहल्यानंतर त्यांचा पॉजिटिव रिपोर्ट आला त्यानंतर त्यांच्या पतीचा रिपोर्ट पॉजिटिव आला दोन रिपोर्ट पॉजिटिव आल्याने खडकी गावाची धडधड वाढली आसताना काल गुरुवारी रात्री उशीरा 75 वर्षी 42 वर्षी महिला तर 15 वर्षी, 17 वर्षी, 22 वर्षी तीन युवक व 53 वर्षी पुरुषाचा रिपोर्ट पॉजिटिव आल्याने खडकीकरांच्या पायाखालची वाळू सरकली असुन गावाची धड धड वाढली आहे
सेवानिवृत्त पीएस आय गावी आल्याने गावातील अनेक लोक भेटाय येत होते अनेक लोकांचा संपर्क आला होता त्यांना भेटाय शेजारच्या गावातील ही अनेक लोक येवून गेले होते आठ दिवसापूर्वी एक हि रुग्ण नसलेल्या खडकी गावात आठ दिवसात 8 पॉजिटिव रुग्ण सापडय़ाने खडकीकरांची झोप उडाली आहे खडकी गावाला प्रांताधिकारी , तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी माननी भेट देवून परिसर शिल करुन हे गांव कंटेन्मेनट झोन करण्यात येवून संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली