कुडाळ / प्रतिनिधी
परुळे पाट म्हापण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एस एल देसाई विद्यालय पाट येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात रक्तदात्यानी उस्फुर्त हजेरी लावून रक्तदान केले.
परुळे,कुशेवाडा, पाट, म्हापण,आंदुर्ले,केळुस,कोचरा या पंचक्रोशीतील उपस्थित सुमारे १०५ रक्तदात्यांची तपासणी करण्यात आली.त्यातील ७५ जणांनी रक्तदान केले. उपस्थित सर्व रक्तदात्यांना उत्साही मित्रमंडळ म्हापण यांच्यावतीने १ लाखाचा विमा व डेटाॕल साबण देण्यात आला. या शिबीरात रक्तदात्यांना काॕफी व नाष्टा तसेच हँडवॉश सॕनिटायझर व इतर साहित्याकरिता श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी परुळे यांनी आर्थिक सहाय्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी पाट हायस्कुल प्रशालेचे संस्थाचालक मुख्याध्यापक,कर्मचारी वर्ग यांचे महत्वाचे योगदान लाभले. या शिबिराच्या आयोजनात निवती पोलिस स्टेशानचे उपनिरिक्षक श्री.साळुंखे,प्राथमिक आरोग्य केंद्र ,रक्त संकलन विभाग सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले. शिबीराच्या आयोजनात निलेश सामंत,योगेश तेली,योगेश शेट्ये,संतोष पाटील,नाथा मडवळ,दत्ता साळगांवकर,प्रसाद पाटकर,बाबल चव्हाण ,प्रथमेश नाईक,राजेश सामंत,जगदिश म्हापणकर यांचे सहकार्य लाभले.