प्रतिनिधी / नागठाणे
पाडळी (ता.सातारा) येथून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद बुधवारी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मालाश्री तारासिंग चव्हाण (रा.पाडळी, ता.सातारा,मूळ रा.एलटी हिटनळी,जि. विजापूर) असे बेपत्ता युवतीचे नाव आहे. सोमवारी दुपारी मालाश्री चव्हाण ही युवती पाडळी गावात ब्युटी पार्लरमध्ये जाऊन येते सांगून घरातून निघून गेली.
सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा दोन दिवस शोध घेतला. बुधवारी आई कस्तुराबाई तारासिंग चव्हाण यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात याची फिर्याद दाखल केली आहे.