ऑनलाईन टीम / बर्लिन :
पाणबुड्या दीर्घकाळ समुद्रात पाण्याखाली राहण्यासाठी एअर इंडिपेंडट प्रोप्लशन सिस्टिमचा (AIP) पुरवठा करण्याची मागणी पाकिस्तानने जर्मनीकडे केली होती. मात्र, जर्मनीच्या सुरक्षा समितीने पाकची मागणी फेटाळली.
पाणबुड्या समुद्रात लपविण्यासाठी पाकला ही सिस्टीम हवी होती. त्यासाठी पाकने जर्मनीकडे केलेल्या मागणीवर जर्मनीच्या चॅन्सलर अँजला मर्केल यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीत मर्केल यांनी पाकिस्तानच्या मागणीला नकार दिला.
पाणबुड्यांना एअर इंडिपेंडट प्रोप्लशन सिस्टिमनसेल तर दर दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. त्यामुळे युद्धाच्या वेळी ही पाणबुडी रडारवर येऊन त्याचे लोकेशन समजू शकते. ही सिस्टिम उपलब्ध असेल तर काही महिने पाणबुडी पाण्याखाली राहू शकते.