12 कामांना प्रशासकीय मंजुरी : कणकवली तालुक्यातील 114 वाडय़ांचा आराखडय़ात समावेश : नळयोजना दुरुस्तीच्या 10 कामांचा समावेश
वार्ताहर / कणकवली:
कणकवली तालुक्याच्या 1 कोटी 28 लाख 10 हजाराच्या पाणीटंचाईच्या आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यातील 114 वाडय़ांचा या संभाव्य पाणीटंचाईच्या आराखडय़ात समावेश करण्यात आलेला आहे. यातील 12 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यात नळयोजना दुरुस्तीच्या 10 व विहिरीतील गाळ काढण्याच्या दोन कामांचा समावेश आहे.
कणकवली ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागामार्फत तयार करण्यात आलेल्या या आराखडय़ात नळयोजना दुरुस्तीची 19, तात्पुरती पूरक नळयोजना 8, विंधन विहिरींची 58, विहिरी खोल करणे व गाळ काढणे 9, विंधन विहिरी दुरुस्ती 20 या कामांचा समावेश केला आहे. या कामांसाठी 1 कोटी 25 लाख 85 हजाराचा निधी आवश्यक होता. जिल्हास्तरावरून या प्रस्तावांना मंजुरी देत असतानाच कामांसाठीच्या निधीत मात्र कपात केल्याचे दिसत आहे.
पाणीटंचाईच्या कामांना भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्रपत्र ब देण्यात आले आहे. कुरंगवणे-गोसावीवाडी येथे सूचविण्यात आलेल्या तात्पुरत्या पूरक नळयोजनेच्या कामांची पूर्तता होऊ शकत नाही, असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या 12 कामांमध्ये नळयोजना दुरुस्तीची वागदे-गावठणवाडी, बौद्धवाडी, कोळोशी मुख्य नळयोजना, करंजे शिरसाटवाडी, हरकुळ बु. डोंगरेवाडी, काळेथरवाडी, हरकुळ खु. तांबळवाडी, शिवडाव मुख्य नळयोजना, सावडाव-गावठणवाडी, खारेपाटण-कोंडवाडी या कामांचा समावेश आहे. विहिरीतील गाळ काढणे करंजे-गावठणवाडी, नागवे-हुलेवाडी या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
58 वाडय़ांमध्ये विंधन विहिरी खोदाई प्रस्ताव
तालुक्यातील 58 वाडय़ांमध्ये विंधन विहिरी खोदाई करण्याबाबत प्रस्तावित आहे. यात पिसेकामते-गावठणवाडी, धनगरवाडी, बिडवाडी-हुंबरणेवाडी, करुळ- मधलीवाडी, तिवरे-खालचीवाडी शाळा, माईण-धनगरवाडी, जानवली-दळवीवाडी शाळा, नाटळ-जाधवववाडी क्रमांक 2, तांबेवाडी, शिवडाव-मांगरवाडी शाळा, दारिस्ते-पवारवाडी, दिगवळे-गावकरवाडी, कळसुली-पुनर्वसन गावठण, भोगनाथवाडी, हसनवाडी, शिरवल-खासकीलवाडी, हळवल-क्षेत्रफळवाडी शाळ क्रमांक 1, कुरंगवणे-कुडाळकरवाडी, खैराटवाडी शाळा, गोठणकरवाडी, नडगिवे-मधलीवाडी, गुंडय़ोवाडी, साळीस्ते-ताम्हणकरवाडी, केंद्रशाळा, तळेरे-बौद्धवाडी, औदुंबरनगर, घाडीवाडी, कुंभवडे-गावठणवाडी, शाळेवाडी, कृपाळवाडी, कावळेटेंबवाडी, शेर्पे- तांबळवाडी, बौद्धवाडी, साकेडी-फौजदारवाडी, वरचीवाडी, ओझरम-धनगरवाडी, माळवाडी, चिटकेवाडी, शिडवणे-कोनेवाडी, वागदे-आर्यादुर्गा, वरवडे-फळसेवाडी, पोळसुंदे, पियाळी-गावठणवाडी, कोंडय़े-सावंतवाडी, फोंडा-वाधारेवाडी नवले घराजवळ, फोंडेकरवाडी, झरयेवाडी, केळोबा, ओसरगाव-मळावाडी, अपराजवाडी, कोळोशी-वरचीवाडी, खारेपाटण-रामेश्वरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, वायंगणी ताम्हणकरवाडी, निवरे-खालचीवाडी, कासार्डे-आनंदनगर, खंडवाडी, हरकुळ बु.- सुतारवाडी, भिरवंडे-आमनीपाचेवाडी, वारगाव-नरवाडी, धुमकवाडी, वाघेरी- खंडय़ांचा मांगर या कामांचा समावेश आहे.
20 वाडय़ांमधील विंधन विहिरींची दुरुस्ती
तालुक्यातील 20 वाडय़ांमधील विंधन विहिरींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात हुंबरट-डोंगरेवाडी, अनंतवाडी, करुळ-फोपेवाडी, डामरे-गावठणवाडी, नरडवे- रवळनाथवाडी, सुतारवाडी, कळसुली-गावडेवाडी, भरणी-गावठणवाडी, वाघेरी- माळवाडी, फोंडा-बोकलभाटले, जानवली-गणपती मंदिर, कसवण-गावकरवाडी, कासरल-कुंभारगाळू, तळेरे-बाजारपेठ, आयनल-रोहिलेवाडी, मणेरवाडी, हरकुळ बु. -कांबळेवाडी, कसालकरवाडी, भिरवंडे-पुनाळवाडी, नरडवे-बौद्धवाडी या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.
17 वाडय़ांमधील नळयोजना दुरुस्ती
फोंडा-गांगोवाडी, कोंडय़े-तेलीवाडी, सावडाव-डगरेवाडी, दारुम-भोगलेवाडी, भरणी-घाडीवाडी, हरकुळ खु.-मोहुळवाडी, कुरंगवणे-गोसावीवाडी, बेळणे- वरचीवाडी या वाडय़ांमध्ये तात्पुरती पूरक नळयोजना करण्यात येणार आहे. तालुक्यातील 17 वाडय़ांमधील नळयोजनेची दुरुस्ती करण्यात येणार असून यात सावडाव-गावठणवाडी, शिवडाव मुख्य नळयोजना, जाधववाडी, हरकुळ बु.- काळेथरवाडी, डोंगरेवाडी, जंगमवाडी, वागदे-बौद्धवाडी, गावठणवाडी, पियाळी- बौद्धवाडी, शिरवल-टेंबवाडी, बौद्धवाडी, कोळोशी मुख्य नळयोजना, कासार्डे- धुमाळवाडी, करंजे-शिरसाटवाडी, घोणसरी-खवळेभाटले, वायंगणी-गावठणवाडी, खारेपाटण-कोंडावाडी, कुरंगवणे-मांजरेकरवाडी, डामरे-कानडेवाडी, हरकुळ खु.- तांबळवाडी, नांदगाव तिठा या कामांचा समावेश आहे.