दोन महिन्यांत 150 कोटी वसुलीचे आव्हान
कोल्हापूर / प्रतिनिधी
महापालिकेचे पाणीपुरवठा, घरफाळा आणि इस्टेट विभाग वसुलीमध्ये पिछाडीवर आहेत. आर्थिक वर्ष संपत आले तरी या विभागाची उद्दिष्टाच्या 50 टक्केही वसुली नाही. प्रशासनाने मनपाच्या विविध विभागाना 472 कोटींचे उद्दिष्ट दिले असून त्यापैकी 282 कोटी जमा झाले आहेत. उर्वरीत वसुलीसाठी पुढील दोन महिन्यांचा अवधी आहे.
जकात नाके बंद झाल्यानंतर कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा, इस्टेट आणि नगररचना (टिपी) उत्पन्नाचे मुख्य स्त्राsत आहेत. पाणीपुरवठ्य़ातून उत्पन्न मिळते मात्र, पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी, देखभाल, विद्युत बीलांमध्ये ते खर्च होते. ना नफा ना तोटा तत्वारच हा विभाग आहे. मात्र, या विभागातूनही अपेक्षित वसुली होत नाही. कोरोनाचा परिणाम व्यापार आणि व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मनपाची वसुलीत घट आला आहे. घरफाळा इस्टेट आणि पाणीपुरवठा विभागाची अपेक्षित वसुली झालेली नाही. याचा थेट परिणाम मनपाच्या वसुलीवर झाला आहे. पुढील दोन महिन्यांत किमान 80 टक्के तरी वसुली होणे आवश्यक आहे.
‘टिपी’चे टार्गेट पूर्ण
युनिफाईड विकास प्रणालीमुळे टिपीचे टार्गेट पूर्ण झाले आहे. डी क्लास नियमावलीमुळे गेल्या चार वर्षात हा विभाग वसुलीत पिछाडीवर होता. बांधकाम परवानगी रखडलेल्या होत्या. यावेळी 36 कोटींचे उद्दिष्टे असताना 48 कोटींचे उत्पन्न येथून मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहे.
प्रमुख विभाग आणि वसुली
विभाग टार्गेट वसुली टक्के
जीएसटी अनुदान 172 कोटी 135 कोटी 78
घरफाळा 100 कोटी 35 कोटी 30
नगररचना 36 कोटी 48 कोटी 107
इस्टेट 31 कोटी 58 लाख 2 कोटी 70 लाख 8
परवाना 41 कोटी 50 लाख 16 कोटी 38
अतिक्रमण 1 कोटी 28 लाख 80 लाख 62
कत्तलखाना 40 लाख 11 हजार 0.28
विवाह नोंदणी 10 लाख 4 लाख 47