प्रतिनिधी / बेळगाव
आदर्शनगर, हिंदवाडी येथे गेल्या कित्येक आठवडय़ांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यामधूनच पाणी वाया जात आहे.
येथील रस्त्याचे काम करताना जलवाहिनी फुटून ही परिस्थिती निर्माण झाली असून आता या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले
आहे.
जलवाहिनीला गळती लागल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रात्री याच ठिकाणी एक दुचाकीस्वार घसरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.