एकमेकांवर मनापासून प्रेम केल्यानंतर विक ऍलन आणि मेलिंडा ऍलन यांनी लग्न केले. पण काही काळानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाले. हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पण येथून एक जीवघेणा बदला घेण्यास सुरुवात झाली. हे दोघे एकमेकांविरोधात जीवघेणे रहस्यमय खेळ खेळू लागले. यामध्ये या दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. पाण्याखाली असलेले हे जीवघेणे खेळ नेमके काय आहेत याची कहाणी डिप वॉटर या चित्रपटात आहे. यामध्ये बेन आफ्लेक, ऍना डी आरमस, ट्रेसी लेट्स, लिल हॉर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऍन्ड्रीयान लीन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून पॅट्रीशिया हायस्मिथच्या याच शीर्षकाच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई