पलुस / प्रतिनिधी
अबब.. पाण्याची टीतून निघाले सहा साप पलूस तालुक्यातील येळावी-आमणापूर रोडवरील एका शेतात हा प्रकार घडला. एका शेतकऱ्याने लागण तुटल्यावर एका खोडवा ऊसाला पाणी करत टी सुरू करून कट्टे धरले आणि पुन्हा पाणी कसे निघते बघण्यासाठी टीकडे वळला. गढूळ पाण्याबरोबर या टी मधून एका पाठोपाठ एक असे सहा साप निघाले. ते तांबूस करड्या रंगाचे हे साप बघताच शेतकऱ्याची पुरती भंबेरी उडाली. मात्र काही क्षणातच हे सर्व साप मृत असल्याचे लक्षात आले. पलूस तालुक्यातील येळावी-आमणापूर रोडवरील एका शेतात हा प्रकार घडला आहे.
याबाबत वन्यजीवप्रेमी आदम सुतार यांना विचारले असता, हे धीवड जातीचे साप असून त्याला स्थानिक भाषेत यीरूळा म्हणतात. हा साप बिन विषारी असून २.५.ते ३ फुटा पर्यंत लांबी असते. त्यांचे पाण्यात व जमिनीवर वास्तव असते. त्यांचा जन्म आंड्यातून होतो. मासे बेडूक हे त्याचे अन्न आहे. अशी माहिती सुतार यांनी दिली.