पृथ्वी अन् अंतराळावर नजर रशियाच्या वैज्ञानिकांकडून मोहीम
रशियाच्या वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच पाण्यात अशी दुर्बीण तैनात केली आहे, जी इनर स्पेस म्हणजेच पृथ्वीच्या आत आणि आउटर स्पेस म्हणजेच अंतराळ दोघांवरही नजर ठेवणार आहे. पृथ्वीच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या कणांचाही ही दुर्बीण शोध घेणार आहे. जगातील सर्वात छोटे कण हे न्यूट्रीनोस असतात, जय या कणांच्या हालचाली वाढल्या तर प्रचंड नुकसान होऊ शकते. याचमुळे त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक आहे.
रशियाच्या वैज्ञानिकांनी अलिकडेच बॅकल सरोवरात एक मोठी स्पेस टेलिस्कोप बसविली आहे. ही दुर्बीण 2015 पासून तयार करण्यात येत होती. न्यूट्रीनोसचा शोध घेणे हे तिचे काम असणार आहे. न्यूट्रीनोसवर देखरेख ठेवणे आणि त्यांचे प्रमाण जाणून घेणे अत्यंत अवघड आहे.
2500 ते 4300 फूट खोल पाण्यात
वैज्ञानिकांनी या दुर्बीणीला बॅकल-जीवीडी नाव दिले आहे. याला बॅकल सरोवरात 750 ते 1350 मीटर म्हणजेच 2500 ते 4300 फूट खोल पाण्यात तैनात करण्यात आले आहे. ही जागा सरोवराच्या काठावरून 4 किलोमीटर अंतरावर आहे. न्यूट्रोनोसचा शोध घेणे अत्यंत कठिण असले तरीही पाण्यात याची तपासणी करणे सोपे असते. याचमुळे दुर्बीण पाण्यात तैनात करण्यात आली आहे.