प्रतिनिधी/कोल्हापूर
ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी येत्या 14 ऑक्टोबरला होणार आहे. गुरूवारी (30 सप्टेंबर) या खटल्यातील दोषारोप निश्चिती (चार्ज प्रेम) बाबतची सुनावणी होणार होती. पण जिल्हा व सत्र न्यायाधिश बी. डी. शेळके हजर नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यासह संशयित आरोपी समीर गायकवाड, त्याचे वकील समीर पटवर्धन देखील उपस्थित होते.