प्रतिनिधी /बेळगाव
बारामती येथील वैमानिक केंद्रातून प्रशिक्षण घेऊन पायलट बनलेल्या दामले हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. अनगोळ येथील नवहिंद एज्युकेशन सोसायटी संचालित दामले हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. आर. दोडमनी यांच्या हस्ते पायलट धनश्री प्रकाश सुतार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिद्द व योग्य प्रयत्न केल्यास विद्यार्थिनी कोणतेही उच्च शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठू शकतात. त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, असे धनश्री सुतार यांनी सांगितले. प्रारंभी पी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी एस. एस. बेळगावकर, एच. बी. पाटील, पी. एम. देसाई, एम. के. सायनाक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. आर. पी. पाटील यांनी आभार मानले.