अत्यंत प्रशिक्षित स्टंट कोऑर्डिनेटर्स देणार प्रशिक्षण
सलमान खान ‘टायगर 3’ या चित्रपटाचे चित्रिकरण 8 मार्चपासून सुरू करणार आहे. टायगर 3 चित्रपटातील ऍक्शन सीक्वेंससाठी सलमान कठोर मेहनत घेत आहे. लवकरच सलमान चित्रपटाकरता पार्कर टेक्निकचे प्रशिक्षणही घेणार आहे.
चित्रपटात स्वतःच्या व्यक्तिरेखेसाठी सलमान स्ट्रिक्ट डाइट आणि वर्कआउटचा नियम पाळत आहे. याचबरोबर दिग्दर्शक मनीष शर्मा या चित्रपटातील रॉ हस्तकाच्या व्यक्तिरेखेसाठी सलमानला काही नवी टेक्निकही शिकविणार आहे.
सलमानला पूर्णपणे तंदुरुस्त करण्यासाठी निर्माता आदित्य चोप्राने दक्षिण आफ्रिकेतून अत्यंत प्रशिक्षित स्टंट कोऑर्डिनेटर्सचे एक आंतरराष्ट्रीय पथकही नियुक्त केले आहे. हे पथक गुरुवारी मुंबईत पोहोचले आहे. बिग बॉस 14 च्या ग्रँड फिनालेनंतर सलमान या आंतराष्ट्रीय पथकाला भेटणार आहे.
प्रोवलिंग कला
चित्रपटासाटी सलमान पनवेल येथील स्वतःच्या फार्म हाउसवर ‘प्रोवलिंग’ची कलाही शिकत आहे. टायगर 3 चे चित्रिकरण सुरू करण्यापूर्वी सलमान शाहरुख खानच्या पठाणचे चित्रिकरण संपविणार आहे. टायगर 3 चे मुंबईतील चित्रिकरण संपल्यावर कलाकार दुबई आणि इस्तंबूल येथे जाणार आहेत.