दोडामार्ग – वार्ताहर-
दोडामार्ग शहरात पार्क करून ठेवलेली एक बजाज पल्सर दुचाकीने अचानक पेट घेतला. व ती जागीच खाक झाली. ही दुचाकी मणेरी येथील असून सावंतवाडा येथील एका गॅरेजच्या आवारात पार्क करून ठेवली होती. सकाळी 10.30 वा. सुमारास या दुचाकीने पेट घेतला असता त्याकडे लक्ष जाताच आसपासच्या राहिवासांनी आपल्या परीने ही आग विजवण्याच्या प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. परिणामी सदर दुचाकी पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सदर दुचाकी बहुधा शॉर्टसर्किटमुळे जळली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे. त्याबाबत येथील पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशिरापर्यत कोणतीही तक्रार नव्हती.