प्रतिनिधी / बेळगाव
शहर व उपनगरात मटका, जुगारविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलिसांनी बुधवारी पार्वतीनगर येथे तिघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
पार्वतीनगर परिसरात मटका सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून तिघा जणांना अटक केली. त्यांच्याजवळून 2 हजार 430 रुपये रोख रक्कम, 22 चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
इमामसाब मेहबूबसाब बेपारी (वय 30), अब्दुल आरिफ सिद्दीकी (वय 30), परशराम ऊर्फ परश्या नागलिंग अनंतपूर (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. ते कसाई खड्डा परिसरातील राहणारे आहेत. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.