किरीट सोमैय्यांचा घणाघात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीचे पालकमंत्री खोटारडे, चिटर आहेत़ त्यांनी सरकारची फसवणूक करुन दापोली येथे रिसॉर्टचे बांधकाम केले आह़े पालकमंत्री ऍड. अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने अनेकवेळा देवूनही जिल्हाधिकारी रिसॉर्ट का पाडत नाहीत, असा सवाल भाजपा नेते माजी खासदार ड़ॉ किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला आह़े
ते भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत़े यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, शहर अध्यक्ष सचिन करमरकर, ऍड. विलास पाटणे आदी उपस्थित होत़े
यावेळी सोमैय्या म्हणाले की, महाराष्ट्र कोस्टल झोन ऍथोरीटीने 4 महिन्यापूर्वीच ऍड. परबांचे रिसॉर्ट अनधिकृत असून सीआरझेड ना विकास क्षेत्रामध्ये बांधलेले हे रिसॉर्ट ताबडतोब तोडण्याचे निर्देश दिले आहेत़ लोकायुक्तांसमोर झालेल्या सुनावणीतही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व राज्याचे महसूल सचिव यांनी यासाठी देण्यात आलेल्या अकृषीक परवाना बेकायदेशीर हे असल्याचे मान्य केले. यामुळे तो परवाना परत घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आह़े ऍड. परब यांनी फसवणूक व फोर्जरी करुन रिसॉर्ट बांधण्यासाठी 504 मीटरची परवानगी मिळवली होत़ी त्याच्यासमोर 17 हजार 500 चौ. फुटचे दुमजली रिसॉर्ट बांधण्यात आले. ते अनधिकृत असल्याने पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ एमआरटीपी कायद्याअंतर्गत रिसॉर्ट बांधण्यावर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. तरीही याबाबत अजूनही कारवाई का करण्यात आली नाहे, असा सवाल सोमैय्या यांनी उपस्थित केल़ा
ऍड. परब या रिसॉर्टची घरपट्टी स्वतःच्या बँक अकाऊंटमधून नियमितरित्या भरत होत़े म्हणजेच अनिल परब या रिसॉर्टचे मालक आहेत. या रिसॉर्टसाठी 3 फेज विद्यृत परवाना महावितरणकडून स्वतःच्या नावावर मार्च 2020 मध्ये अनिल परब यांनी घेतल्याचे सोमैय्या यांनी सांगितल़े लोकायुक्तांकडे राज्य सरकारने हे मान्यही केले आणि पाडण्याचे आदेश देण्याचीही कबूल केल़े या रिसॉर्टच्या मालकाविरुध्द कारवाईचेही निर्देश दिले असूनही अजूनपर्यंत ऍड. परब यांच्या विरोधात कारवाई का केली नाह़ी याचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमैय्या यांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेतल़ी
मुख्यमंत्री करताहेत पाठराखण
बेकायदा बांधकाम प्रकरणी मुख्यमंत्री स्वतः अनिल परब यांची पाठराखण करत असून परबांनी केलेल्या मनीलाँड्रीग व अन्य काही गुह्यांमुळे त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी सोमैय्या यांनी केल़ी ईडी व प्राप्तीकर विभागाने आपली तक्रार नोंद घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सोमैय्या म्हणाल़े
दोषी असतील त्यांच्यावर कारवाई
राज्य सरकारमधील 40 नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढणार असून यामध्ये रत्नागिरीमधील नेत्यांचाही समावेश असेल का याबाबत त्यांनी थेट न बोलता जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगितल़े
अधिकाऱयांची चौकशी करा
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी अनधिकृत रिसॉर्टबद्दल क्लिनचिट अहवाल मंत्रालयात पाठवला असून यामध्ये अधिकारी देखील सामील असल्याचे सोमैय्या यांनी सांगितल़े त्यामुळे संबंधित अधिकाऱयांची चौकशी करुन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सोमैय्या यांनी केली आह़े