प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱयावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता खासगी हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह ओरोसकडे प्रयाण. सकाळी 10.15 शासकीय विश्रामगृह ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण मोहिमेबाबत आढावा बैठक. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी 11.15 वाजता कुणकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांसमवेत बैठक. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय. सकाळी 11.45 वाजता महावितरणच्या अधिकाऱयांसमवेत बैठक. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी 1.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड ओरोसकडे प्रयाण. 1.30 वाजता पोलीस परेड ग्राऊंड ओरोस येथून खासगी हेलिकॉप्टरने पाली (जि. रत्नागिरी) गावाकडे प्रयाण.