मालवण/प्रतिनिधी-
बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीप्रकरणी पालकमंत्री उदय सामंत यांनी आमनेसामने यावे. पालकमंत्री पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने आहेत की नाही हे त्यांनी जाहीरपणे सांगावे, असे आवाहन सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांनी केले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन, अधिनियम १९८१ अंतर्गंत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात १ जानेवारीपासून ३१ ॲागस्टपर्यंत पर्ससीन मासेमारीवर बंदी लागू असताना पर्ससीन नौका मासेमारीस जातातच कशा. एलईडी पर्ससीन मासेमारीवर पूर्णतः बंदी असताना एलईडी पर्ससीन मासेमारी होतेच कशी? असे सवाल पारंपरिक मच्छीमारांनी उपस्थित केले.