प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत 12 व 13 जानेवारीला सिंधुदुर्ग दौऱयावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे-
रविवार 12 रोजी सकाळी 10 वाजता खारेपाटण येथे आगमन व कार्यकर्त्यांसमवेत संवाद, सकाळी 10.25 वा. खारेपाटण येथून वैभववाडीकडे प्रयाण, 11 वा. वैभववाडी येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दुपारी 12 वा. वैभववाडी येथून कणकवलीकडे प्रयाण, 12.45 वा. कणकवली येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दुपारी 1.30 ते 2.30 वा. आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी राखीव, दुपारी 2.30 वा. कणकवली येथून देवगडकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. देवगड येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा, दु. 4.30 वा. देवगड येथून मालवणकडे प्रयाण, सायं. 5.30 वा. मालवण येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा, सायं. 6.30 वा. मालवण येथून कुडाळकडे प्रयाण, सायंकाळी 7.30 वा. कुडाळ येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा, रात्री 9 वा. एमआयडीसी विश्रामगृह, कुडाळ येथे मुक्काम.
सोमवार 13 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. एमआयडीसी विश्रामगृह, कुडाळ येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, सकाळी 10.30 वा. ओरोसकडे प्रयाण, 11 वा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती, 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन डी. पी. डी. सी हॉल येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी यांच्यासमवेत जिल्हा सर्व विभाग आढावा बैठक, दुपारी 1.30 ते 2.30 वा. राखीव, दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा पर्यटन अधिकारी, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱयांसमवेत चांदा ते बांदा व पर्यटन आढावा बैठक, दुपारी 3.45 वा. पत्रकार परिषद, दुपारी 4 वा. ओरोस सिंधुदुर्गनगरी येथून वेंगुर्लेकडे प्रयाण, 4.30 वा. शिवसेना कार्यकर्ता मेळावा, सायंकाळी 5 वा. सावंतवाडीकडे प्रयाण, सायंकाळी 5.30 वा. सावंतवाडीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा, सायंकाळी 6.30 वा. दोडामार्गकडे प्रयाण, 7.15 वा. दोडामार्ग येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा, रात्री 8.30 वा. दोडामार्ग येथून मोटारीने गोवा विमानतळाकडे प्रयाण.