पंढरपूरसह , अक्कलकोटला दौरा, कोरोना आढावा बैठक घेणार
सोलापूर/प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे उद्या दि. 19 रोजी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शहरासह पंढरपूर अक्कलकोट या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना संदर्भात बैठक घेणार आहेत.
पालकमंत्री भरणे सकाळी साडे 11:30 वाजता पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा बैठक घेणार आहेत. दुपारी पावणे एक वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी चार वाजता पालकमंत्री भरणे अक्कलकोट कडे रवाना होणार आहेत. अक्कलकोट पंचायत समितीच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी सहा वाजता अक्कलकोट येथून ते इंदापूरकडे रवाना होणार आहेत.