नागरिकांनी केला सत्कार, बसवेश्वर मंदिराचा करणार आहेत जीर्णेद्धार
वार्ताहर/ किणये
संतिबस्तवाड येथील बसवेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्यावतीने मंदिराच्या जीर्णेद्धारासाठी प्रयत्न चालू केले आहेत, पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी संतिबस्तवाड गावाला रविवारी धावती भेट दिली. गावातील इतर समस्याबद्दलही त्यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. यावेळी ग्रामस्थाच्ंयावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी आमदार संजय पाटील, किरण जाधव, हेमंत पाटील, संतिबस्तवाड ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष ओsमाणा पाटील, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष नागय्या पुजारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गावातील बसवेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यणार आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पालक मंत्री रमेश जारकीहाळी यांना दिली होती. व गावाला एक वेळा भेट देऊन मार्गदर्शन करण्याचे सांगितले होते. गावकऱयांच्या विनंतीला मान देऊन जारकीहोळी यांनी भेट देऊन मंदिराच्या संकल्पासाठी शुभच्sछा दिल्या. तसेच या भागातील काहीसमस्या असतील त्याही नागरिकांनी बिनधास्तपण आपल्याला सांगाव्यात. त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
यावेळी विठ्ठल अंकलगी, पिराजी देवरमनी, शुभम सावंत, शुभम माळी, तुकाराम बस्तवाडकर, नवनाथ बस्तवाडकर, नागेंद्र सिद्दण्णावर, सातेरी माळी, रुक्मण्णा मेलगे, सातेरी माईनकर, इराकांत जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन भरमा गुडूमकेरी यांनी केले तर रामदास बस्तवाडकर, यांनी आभार मानले.