प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यातील कोरोनाचा वेग मंदावत असतानाच आज पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. यासंबंधी स्वत: पालकमंत्री पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून ही माहिती दिली.
जिल्ह्यात काल, सोमवारी कोरोनाचे नवे 3 रूग्ण आढळून आले तर तिघे कोरोनामुक्त झाले होते. यानंतर आजपर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 50 हजार 011 झाली तर यातील 48 हजार 167 रुग्ण आजपर्यंतकोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 115 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 676 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.