प्रतिनिधी/ बेळगाव
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सर्किट हाऊस येथे जिल्हा पालकमंत्री तथा राज्य पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विमल फौंडेशनचे अध्यक्ष व भाजप नेते किरण जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पालकमंत्री जारकीहोळी यांनी रोप लागवड करून निसर्गसंपदा वाढविण्याचे आवाहन केले. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.