प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निकालावेळी एक अज्ञात चोरटा पुढाऱ्याच्या वेशात येऊन पाकीट मारत होता. त्याने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे पार्किट मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला तांबव्याच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीनंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे वेधले होते. मंगळवार दि. 23 रोजी सकाळीपासून निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यास सुरूवात झाली. यावेळी उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निकाल जाहीर होईल तसा कार्यकर्त्याचा जल्लोष सुरू होता. या जल्लोषात एक चोरटा पुढाऱ्याच्या वेशात आला होता. त्याने तीन कार्यकर्त्यांची पार्किट चोरली. यानंतर तो पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जवळ पोहचला. तो पालकमंत्र्याचे पार्किट चोरण्याचा प्रयत्न करता होता. यावेळी ताब्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी चोरट्याला पकडले आणि गर्दीतून बाहेर नेत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ तीन पाकिटे आढळून आली. ही पाकिटे त्याने चोरल्याची कबुली दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.