वार्ताहर / मौजे दापोली
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड येथे भरदुपारी घरफोडी करणाऱ्या दोघांना दापोली न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन त्यांना सोडून देण्यात आल्याचे दापोली पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.
शैलेश घोरपडे (वय 36) व संतोष अंगडी (वय 32) सध्या राहणार दापोली शहरातील नांगरबुडी, हे दोघे पालगड येथील तांब्या पितळेची भांडी चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना या चोरट्यांना रंगे हात पकडण्यात आले होते. यानंतर त्यांना ग्रामस्थांनी चोप देखील दिला होता. यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. परंतु त्या दोघांकडून हमीपत्र घेऊन त्यांना सोडून करण्यात आले आहे.