पोलीस अधीक्षकांनी घेतली गंभीर दखल
प्रतिनिधी / पेडणे
लाॕकडाऊन काळात नियमाचे उल्लंघन करत पालये येथे पठारावर जंगलात विदेशी नागरिक पार्टय़ांचे आयोजन करत असल्याची विडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर उत्तर गोवा पोलीस अधिक्षक उत्कृष्ट प्रसून्न यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत रविवारी दुपारी पालये पठारावरील बनियान ट्री तसेच ज्या ठिकाणी विदेशी नागरिकांनी पार्टी आयोजित केलेल्या ठिकाणी पेडणे पोलिसांना सोबत घेऊन पाहणी करुन पेडणे पोलिसांना मार्गदर्शन केले.
उत्तर गोवा पोलीस अधिक्षक यांनी दुपारी पालये पठारावर व हरमल येथील पठारावर भेट देऊन ज्या ठिकाणी विदेशी नागरिकांनी पार्टी केली. त्या परिसरात म्हापसा उपअधिक्षक गजानन प्रभूदेसाई , पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर , उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी तसेच आदी पोलीस कर्मचारी यांच्या सोबत पाहणी करत विविध सूचना केल्या .
- विदेशी नागरिकांना स्थानिक नागरिक खाजगी गाडय़ा भाडेपट्टीवर देतात. त्यामुळे लाॕकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करत हे विदेशी नागरिक सर्वत्र बिनधास्त फिरतात तसेच पार्टय़ांचे आयोजन करतात .
- विदेशी पर्यटकांना नागरिकांनी खाजगी गाडय़ा देऊ नयेत दिल्यास कारवाईः उत्तर गोवा अधिक्षक
विदेशी पर्यटकांना स्थानिक नागरिकांनी तसेच गोमंतकीय नागरिकांनी आपल्या खाजगी दुचाकी तसेच चारचाकी गाडय़ा देऊ नयेत. स्थानिक नागरिक अशा आपल्या गाडय़ा भाडेपट्टीवर विदेशी पर्यटकांना देतात. त्यामुळे लाॕकडाऊन काळात नियमाचे उल्लंघन हे विदेशी नागरिक करतात. खाजगी गाडय़ा घेऊन फिरणा-या विदेशी नागरिकांवर पोलीस कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अधिक्षक उत्कृष्ट प्रसून्न यांनी दिला.
- रेंट अ बाईकवरही होणार कारवाईः उत्कृष्ट प्रसून्न
नागरिकांनी आपल्या जागेत भाडेपट्टीवर ठेवणा-या विदेशी पर्यटकांना लाॕकडाऊन काळात नियमाचे उल्लंघन करु नये अशी सूचना करावी.तसेच आपल्या गाडय़ा त्यांना देऊ नये अशा गाडय़ा विदेशी नागरिकांकडे ते फिरताना सापडल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.