प्रतिनिधी / पेडणे
पालये पेडणे येथील हरी पालयेकर यांचे घरफोडून चोरी करुन सुमारेदोन लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम रुपये 22 हजार चोरी केल्या प्रकरणी पेडणे पोलिसांनी गणेश म्हापसेकर वय 23 राहणारा नास्नोळ बार्देश व फिरोज मिरावज राहणार करासवाडा व मुळ हुबळी येथील दोन संशयीत चोरटय़ांना पेडणे पोलिसांनी पकडून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करत अटक करुन तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली.
पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पालये येथील हरी पालयेकर यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने घर फोडून चोरी करुन सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या वस्तू तसेच रोख रक्कम चैरी केली होती.यासंबंधीची तक्रार पालयेकर यांनी पेडणे पोलीस स्थानकात दिली होती.
त्यानंतर पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी आपल्या टिमद्वारे विविध ठिकाणी या संबंधी माहिती गोळा करत तसेच स्थानिक लोकांच्या सहकार्याने सर्व माहिती घेत पेडणे पोलिसांनी चोरी केलेले सोन्याचे दागीने म्हापसा येथे विकलेल्या एका सोनाराला ते वितळण्यातआले होते ते ताब्यात घेत दोन्हीही संशयीत आरोपीना ताब्यात घेतले.
या दोघाही संशयीत आरोपीना पकडण्यासाठी निरीक्षक जिवाबा दळवी यांनी टिम तयार करुन यात उपनिरीक्षक हरिष वायंगणकर’ उपनिरीक्षक विवेक हळर्णकर , का?न्स्ट?बल रवी मालोजी , अनिशकुमार पोके यांनी विशेष परिश्रम घेत संशयीत चोरटय़ांना ताब्यात घेतले. पुढील तपास निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.