वार्ताहर /पालये
पालये सार्वजनिक गणेशोत्सवाचा आज 8 सप्टेंबर रोजी नववा दिवस असून सकाळी 9.30 वाजता भंडारवाडातर्फे भजनाचा कार्यक्रम, सकाळी 10.30 वा. मंडळाचे अध्यक्ष जयराम परब व संगीता जयराम परब या दाम्पत्याच्या यजमानपदाखाली सत्यनारायण महापूजा, दुपारी 1.30 वाजता आरती व महाप्रसाद होईल. संध्याकाळच्या सत्रात 4 वाजता संत सोहिरोबानाथ महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, 7 वा. ह.भ.प. वंदना जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन होईल.
कीर्तनास संवादिनी, तबला, मंजिरीसाथ अनुक्रमे अभिषेक जोशी, विवेकबुवा जोशी, प्राजक्ता जोशी यांची लाभेल. कीर्तनाचा कार्यक्रम उद्योजक सत्यवान आत्माराम नाईक व माजी सरपंच उदय गवंडी यांच्या सौजन्याने होईल.
उद्या सांगता सोहळा
9 सप्टेंबर रोजी दहाव्या दिवशी समारोप सोहळा होणार आहे. यानिमित्त सकाळी 10 वाजता शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव सोहळा व बक्षिसवितरण सोहळा होणार आहे. दुपारी 1 वा. आरती, महाप्रसाद, सायं. 4.30 वाजता श्रीची भव्य विसर्जन मिरवणूक होईल.