प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेचे पथक दररोज गस्त घालत आहे. पोलीस ही फिरत असतात. दरम्यान, आज सकाळी रविवार पेठ भाजी मंइर्ड ते सातारा मार्केट कमिटीलगत बसणाऱया भाजी मंडईत गर्दी झाल्यावरुन पालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे काररवाई केली. यामुळे चांगलीच सातारकरांची तारांबळ उडाली होती. मात्र, या कारवाईबाबत सातारकरांनी नाराजी व्यक्त केली.
कडक लॉकडाऊनचे निर्देश जिल्हाधिकाऱयांनी दिल्यानंतर साताऱयात काही ठिकाणी गर्दी दिसत होती. त्याच अनुषंगाने सातारा पालिकेच्या पथकाने आज सकाळी रविवार पेठेतील भाजी मंडई परिसरात नागरिकांनी भाजी खरेदीकरता गर्दी केली होती. ती गर्दी पाहून सातारा शहर पोलीस आणि पालिकेच्या पथकाने तेथे कारवाई केली. ज्यांनी सोशल डिस्टन्स पाळला नव्हता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालिकेचे पथक आणि पोलीस गाडी येताच नागरिकांची पळापळ झाली. नागरिकांनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली.