एका आठवडयात प्रत्यक्ष कार्यवाहीला होणार सुरुवात
प्रतिनिधी/ सातारा
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यावर सातत्याने शहरातील नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत होती. सातारा पालिकेच्यावतीने यावर उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱयांनी पाठपुरावा केला अन् येत्या काही दिवसांमध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिंजीकरण करण्याचे काम सुरु होणार आहे. एका कंपनीला ठेका देण्यात आला असून ती कंपनी दररोज किमान शंभर भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार आहे.
सातारा शहरात रात्रीच काय दिवसाही रस्तोरस्ती व गल्लोगल्ली भटकी कुत्री भटकताना पहायला मिळतात. अनेकदा या कुत्र्यांच्या दहशतीचा प्रत्ययही सातारकरांना आलेला आहे. सातारकरांनी यावर उपाययोजना करण्याची मागणी पालिकेकडे केली होती. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेतर्फे त्याकरता निर्बिजीकरणाची मोहिम राबवता येईल यावर विचारमंथन करुन निर्णय घेतला. पालिकेच्या पदाधिकाऱयांनी यामध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांना निर्बिंर्जींकरण करण्याच्या मोहिमेचे काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया काढल्या. त्यामध्ये एका कंपनीने हा ठेका घेतला असून येत्या काही दिवसात ही कंपनी शहरातील भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करणार आहे. किमान दररोज 100 भटक्या कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याकरता त्या कंपनीकडून शस्त्रक्रिया रुम, व्हेटेनरी रुम यासह वैद्यकीय स्टॉप व इतर सुविधांची तयारी करण्यात येत आहे. एका आठवडय़ामध्ये ही प्रक्रिया सुरु होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
इन कॅमेऱयात केल्या जाणार शस्त्रक्रिया
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. तीन कंपन्यांनी टेंडर भरले होते. सर्वात कमी दराचे टेंडर उत्कर्ष या संस्थेला मिळाले आहे. त्यांच्याकडून पाच दिवसामध्ये भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरु होईल. दररोज शंभर कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्या जातील. दोन महिन्यात शहरातील अडीच ते तीन हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया इन कॅमेऱयात केल्या जातील. शहरवासियांच्या मागणीनुसार ही उपाययोजना आम्ही राबवत आहोत.
मनोज शेंडे उपाध्यक्ष