प्रतिनिधी/ सातारा
पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 च्या अंतर्गत नागरिकांची व्यस्तता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दि. 12 नोव्हेबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये 60 जण सहभागी झाले होते.
या स्पर्धेत लघु चित्रफित गटात प्रथम मंगेश चिकणे आणि ग्रुप, द्वितीय संचित घाडगे आणि ग्रुप, सार्थक शिंदे आणि ग्रुप तर पथनाटय़ प्रकारात प्रथम क्रमांक गणेश जाधव आणि ग्रुप, द्वितीय क्रमांक आदिती काकडे आणि ग्रुप, तृतीय क्रमांक समृद्धी शिंदे आणि ग्रुप यांनी पटकावला. भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम प्रणिती सचिन माळी, द्वितीय क्रमांक स्वरा गंजीवाले, तृतीय क्रमांक दर्शन मोरे यांनी पटकावा आहे.
तसेच रेखाचित्र स्पर्धेत साक्षी हिने प्रथम, स्वराली हिने द्वितीय, तृतीय क्रमांक प्रितिका हिने पटकावला. पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक सोमनाथ भाटे, श्रीजित घाडगे द्वितीय, तृतीय अर्थ महामुनी, चारोळी स्पर्धेत प्रथम आदिती चोरट, द्वितीय मुग्धा शाह, तृतीय माही अवघडे यांनी यश मिळवले आहे.