प्रतिनिधी/ सातारा
मुख्याधिकारी अभिजीत बापट हे सकारात्मक दृष्टीकोनातून काम करतात. त्यामुळे पालिकेचे कर्मचारीच नव्हे तर सत्ताधारी सातारा विकास आघाडी, विरोधक नगरविकास आघाडी, भाजपाचे नगरसेवक त्यांच्या कामाचे कौतुक करत असतात. सर्वांना सोबत घेवून जाणारे आणि विकासाचे कामे करणारे अशी बापट यांची ओळख आहे. राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे याच योजनेमध्ये पालिका कर्मचाऱयांकरता घरकुले देण्याकरता नोंदणी करा, अशी सुचना त्यांनी कर्मचाऱयांना करताच पालिका कर्मचारी नाव नोंदणी करु लागले. परंतु पत्नीच्या नावाने घर असावे असा अद्यादेश असल्याने पत्नीच्या नावाने नोंदणी सुरु आहे.
सातारा पालिकेचे कर्मचारी पिढय़ान पिढया सातारकरांची सेवा करत असतात. परंतु त्यांना हक्काचे घर काही मिळत नाही. कुठे तरी तुटक्या फुटक्या घरात रहात असतात. अशा अवस्थेत पालिकेच्या माध्यमातून सातारकरांना सेवा देत असतात. पालिका कर्मचाऱयांना सतत वाटत असते की आपल्याला कधी ना कधी चांगले हक्काचे घर मिळेल. त्यांचे हे स्वप्न आता पुरे होणार आहे. म्युनसिपल कामगार युनियनने अनेकवेळा पालिका कर्मचाऱयांना घर मिळावे म्हणून आंदोलने केली. मागण्या केल्या मात्र आता त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार आहे. राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे या योजनेतून घरकुले देण्याकरिता नाव नोंदणी करा अशा सुचना पालिका कर्मचाऱयांच्या संघटनेस मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सातारा म्युनसिपल कामगार युनियन लाल बावटा यांच्या संघटनेकडून नोंदणी अभियान सुरु असून 333 जणांनी नोंदणी केली आहे. महिलांच्या नावाने आता घर पालिका कर्मचाऱयांना मिळणार आहे. त्यांची ही नाव नोंदणी युनियनचे खजिनदार तुकाराम गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.
पालिका कर्मचाऱयांच्या पत्नीच्या नावाने मिळणार घर
पालिका कर्मचाऱयांना घर असावे अशी आमची मागणी होती. त्या मागणीनुसार व जीआरनुसार कर्मचाऱयांच्या पत्नीच्या नावाने घरकुल नोंदणी सुरु झाली आहे. 300 स्वेअर फुटाच्याव वरचे घर असेल तर बजेटनुसार तरतूद स्वतःची स्वतः करायची आहे. त्याच्या 300 स्केअर फुटास शासन सहकार्य करणार आहे, अशी माहिती म्युनसिपल कामगार युनियनचे सचिव श्रीरंग घाडगे यांनी सांगितले.