दोन अभियंत्याची बदली, दोन अभियंत्यांना पालिकेत पदस्थापना
प्रतिनिधी/ सातारा
सतत चर्चेत राहणारे व सतत कामकाजात व्यस्त असणारे पालिकेच्या बांधकाम विभागाचे चार अभियंते. त्यांना तब्बल 25 वर्षांनी चार अभियंत्यांना सेवेत कायम करुन घेतले. त्यापैकी दोन अभियंत्यांची बदली झाली तर दोन अभियत्यांना पालिकेतच पदस्थापना देण्यात आली. त्यांनी सगळय़ा कर्मचाऱयांना पेढे भरवले.
सातारा पालिकेच्या बांधकाम विभागात सुधीर चव्हाण, अनंत प्रभुणे, धनंजय शिंदे आणि प्रदीप साबळे यांना ठेका पद्धतीने कामावर घेतले. चारही अभियंते पालिकेचा बांधकाम विभाग असो पाणी पुरवठा असो वा वृक्ष विभाग असो कोणतेही काम असेल तर चौघांशिवाय होणार नाही, असे सातारा पालिकेत गणित. चौघांनीही अतिशय तुटपुंजा पगारावर काम केले. मिळेल ते पडेल ते काम करत दिवस काढले. त्यांचा लढा सुरुच होता. त्यामध्ये त्यांना यश मिळाले असून नुकतेच नगरविकास विभागाने त्यांना कायम केले. त्यातील सुधीर चव्हाण, प्रभुणे यांना तेथेच तर शिंदे यांना रहिमतपूर नगरपालिका येथे बदली तर साबळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली.