प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात एका बाजुला साथरोग वाढू लागले असताना उपाययोजना करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे असलेल्या दहा धुर फवारणी मशिन बंद अवस्थेत आहेत. एखाद्या नगरसेवकांनी जर प्रभागात धुर फवारणी मशिनच्या सहाय्याने फवारणी करण्यात यावी, अशी विनंती आरोग्य विभागाकडे केली तर मशिन बंद आहे अशी उत्तरे दिली जात आहेत. गेल्या दहा दिवसांपासून ही मशिंन दुरुस्त करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सातारा पालिकेची अनास्था दिसन येत आहे.
सातारा शहरात पालिकेच्यावतीने प्रत्येक प्रभागात धुर फवारणी करण्यात येते. परंतु सध्या साथरोग आजार काही प्रभागात उदभवले आहेत तर काही भागात उदभवण्याची भिती आहे. त्यामुळे काही नगरसेवकांकडून धुर फवारणी मशिनची मागणी केली जाते तेव्हा आरोग्य विभागातील आधिकारीच सर्वच मशिन्स बंद आहेत, असे उत्तर देतात त्यामुळे नगरसेवकांनाच डोक्यावर हात मारुन घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. या मशिन दुरस्त करणे हे पालिकेचे काम असून त्या दुरुस्ती ही केल्या जात नाहीत त्यामुळे युद्याच्या वेळी तलवारींना गंज असा प्रकार सातारा पालिकेत सुरु आहे. लवकरात लवकर मशिन्स सुरु करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.