एका बाजूला फोटोसेशन तर दुसरीकडे कचरा, एका कर्मचाऱयाला फिरायला अलिशान गाडी टोयाटो
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात अनेक ठिकाणी कचऱयाचे साम्राज्य आहे. कचऱयाचे नियोजन कोलमडले असून आरोग्य विभागाच्यावतीने गोळा करण्यात येणारा कचरा सोनगाव कचरा डेपोत बाहेरच टाकला जात आहे. त्यामुळे सोनगाव कचरा डेपोच्या नजिकच्या गावांना नाक मुठीत धरुन जावे लागत आहे. दरम्यान, दुसऱया बाजूला शहरात नाक मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.
सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी सातारा पालिकेच्यावतीने नेहमीच प्रयत्न होत असतो. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी चांगले काम करत असले तरीही नियोजन करणाऱया अधिकाऱयांकडून दुर्लक्ष होत असल्याने गोळा केलेला कचरा चक्क सोनगाव कचरा डेपोत टाकण्याऐवजी बाहेरच रस्त्यावर टाकण्यात येतो. रस्त्याच्याकडेने हा कचरा अगदी सोनगावपर्यंत तर दुसरीकडे कुरणेश्वरच्या पुढे बोगद्याच्या बाजूने परळीकडे जातानाही दिसून येतो. कचरा रस्त्याकडेला पडतोच कसा?, त्यामुळे साताऱयाचे ओंघळवाणे दृश्य पहायला मिळते आहे. आपले सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने सातारा पालिकेकडुन प्रयत्न थिटे पडत आहेत. त्याचेच हे उदाहरण असून दुसऱया बाजूला मात्र स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने साताऱयात पदाधिकाऱयांच्याकडून व कर्मचाऱयांकडून प्रत्येक वॉर्डात शपथ घेतली जात आहे.