शुक्रवार दि. 3 रोजी सभा होणार ऑनलाईन, सभा होणार की गुंडाळणार?
प्रतिनिधी/ सातारा
gगेल्या पंधरा महिन्याच्या कोरोनाच्या कालावधीत सातारा पालिकेला कोरोनाचे कारण देत ज्या ऑनलाईन सभा दोन तीन झाल्या त्याही काही कालावधीत उरकत्या घेतल्याचा आरोप नविआकडून होत आहे. एक सभा तर सुरु होण्यापूर्वीच स्थगित करण्यात आली होती. त्यावर सभा घेण्यात आली नव्हती. आता निवडणुका जवळ येताच पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने तातडीने घेण्याच्या हालचाली झाल्या असून ही सभा दि. 3 रोजी होत आहे. त्या सभेकरता 58 विषयांचा अजेंडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही सभा तरी होणार काय गुंडाळली जाणार असाही प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे.
नविआकडून सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभा या ऑफलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, सत्ताधारी साविआकडून कोरोनाच्या निकषामुळे ऑफलाईन सभा घेता येत नाही. ऑनलाईनच घेता येते असे सांगण्यात येते. तशा पद्धतीची सभा घेतली जाते. 3 फेब्रुवारीनंतर सातारा पालिकेची सभा होत आहे. या सभेच्या अजेंडय़ावर तब्बल 54 विषय आहेत. नगरपालिकेची निवडणूक जवळ येवून ठेपली असल्याने सर्वसाधारण सभेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अजेंडय़ावर असलेल्या विषयांमध्ये पालिकेच्या हद्दीत सर्व्हे नं. 337 करंजे तर्फ सातारा मधील प्लॉट क्र. 1 ते 14 धारकांनी न्यायालयात दाखल केलेल्या दिवानी दाव्याच्या निकालावर तडजोड करण्याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेणे, हा विषय सुरुवातीलाच गाजणार आहे.
करंजे एमआयडीसी भूखंड प्रकरण गेल्या कित्येक वर्षापासून गाजत असून त्यावरुन विरोधक सत्ताधाऱयांच्यावर तुटून पडण्याची शक्यता आहे. शहरातील 20 प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी असलेल्या घंटागाडय़ांची देखभाल, दुरुस्ती, गाडी चालकांची पगार, कामगार, डिझेल याचे बिल काढण्याचा विषय, आरोग्य विभागातील विविध कामांच्या निविदा, घंटागाडीमार्फत कचरा गोळा करुन तो सोनगाव कचरा डेपोत टाकण्याकरता नवीन वार्षिक दरपत्रक मागवण्याची विषय, ओडीएफ प्लस बाबत निर्णय घेणे, गोडोली येथील जिजाऊ उद्यानातील दुरुस्तीच्या कामासाठी 14 लाख 62 हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी देणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसवणे, 2021-22 या वर्षासाठी कायदेशीर सल्लागार नेमणे, प्रभाग 17 मधील रामाचा गोट येथील ओढय़ालगत संरक्षक भींत बांधण्याच्या कामासाठी 15 लाख 33 हजार 228 रुपयांच्या खर्चास मंजूरी देणे, प्रभाग 5 मधील मोकळया जागेत नवीन विकसीत करण्यात आलेल्या बागेस सावित्रीमाई यांचे नाव देणे, पीएफच्या रक्कमेवरील व्याज व 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱयांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंतर्गत जमा होणाऱया रक्कमेवरील व्याजाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात व राष्ट्रीय वेतन खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर निर्णय घेणे, सातारा पालिकेमार्फत दिला जाणारा कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाने दिला जाणारा सामाजिक कार्य पुरस्कार, पत्रकार पुरस्कार, कोव्हिड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यासाठी येणाऱया खर्चास व कामास मंजूरी देण्याचा निर्णय घेणे आदी 58 विषयांवर चर्चा होणार आहे.