आजपासून फलटण पालिकेसमोर बेमुदत धरणे सुरु
प्रतिनिधी/ फलटण
फलटण नगरपालिकेने यापुर्वी शहरातील काही अतिक्रमणे हटविली आहेत, यानंतर ही मोहिम थांबविण्यात आली होती. पुन्हा अतिक्रमण हटाव मोहमपालिकेने त्वरीत सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजल्यापासुन विरोधी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत.
या आंदोलनास ऍड.नरसिह निकम, पालिका भाजपा गटनेते व नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, भाजपा उपजिल्हा अध्यक्ष रविंद्र फडतरे, माजी नगरसेवक राजेश शिंदे, भाजपाचे शहर अध्यक्ष अमोल सस्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष राहुल पवार, मनसेचे उपतालुका प्रमुख निलेश जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, शहर अध्यक्ष महादेव गायकवाड, वंचितचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, दलित पँथर फलटण तालुकाध्यक्ष मंगेश आवळे, सामाजिक कार्यकर्ते प्रीतम जगदाळे, मेहबुब मेटकरी, राहुल शहा, उषा राऊत, सुभाष जेबले, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आदिंनी पाठींबा व्यक्त करीत प्रत्यक्ष हे सर्वजण धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.